नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने नाकारला असून त्यांनी जामिनासाठी पुन्हा नव्याने अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर पुढील सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे. सुनील केदारांची नागपूर खंडपीठात धाव जामिनासाठी पुन्हा नव्याने अर्ज दाखल अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. 30 डिसेंबर रोजी सत्र न्यायालयाने केदार यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. 22 डिसेंबरला केदार यांना न्यायालयाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती, 28 डिसेंबरपासून केदार तुरुंगात कैद आहेत.