33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट मिळाली आहे. तर फडणवीस सरकार काळात महाविकास आघाडीकडून चौकशी समिती नेमली होती. तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या चौकशी समिती दरम्यान चौकशीत कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल समोर आला आहे.
यासोबतच मोहिम राबवताना काही अडचणी व त्रुटी राहिल्याचे अहवालात नमूद केले होते. राज्यात मोहिम यशस्वी झाल्याचे समितीने स्पष्ट मत केले. त्याचसोबत लहान रोपट्यांऐवजी मोठी रोपटी लावण्याची आणि खाणींच्या परिसरात झाडे लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.