चेंबूरमधील महाविद्यालयात हिजाबबंदी करण्यात आली आणि याचं निर्णयाविरोधात विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एनजी आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात हिजाबबंदी करण्यात आली.
महाविद्यालय प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात नऊ विद्यार्थिनींनी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. वर्गात नकाब, बुरखा आणि हिजाब घालण्यावर बंदी घालण्याचा महाविद्यालयाचा निर्णय मनमानी, अवाजवी, विकृत आणि कायद्याच्या चौकटीत चुकीचा असल्याचा दावा करून तो रद्द करण्याची मागणी केली आहे.