ईडी आणि EOW ची चैकशी थांबवा. महापालिकेतील अभियंता संघटनेची हायकोर्टात धाव घेतली आहे. कोरोना काळात झालेल्या व्यवहाराची ईडी आणि EOW करत असलेली चौकशी बेकायदेशीर चौकश्या थांबवा, ही मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केली. आपातकालीन व्यवस्थापन कायदा 2005, व महामारी कायदा 1850 अंतर्गत कोरोना काळात निर्णय घेण्यात आले. घाइत केलेल्या निर्णयात तपासयंत्रणांनी अनियमितता दाखवून कारवाई करु नये अशी मागणी केली आहे. दोन्ही कायद्याचे संरक्षण असतानाही तपासयंत्रणा बेकायदेशीर चौकशी करत आहे. महापालिका स्वायत्त संस्था त्यामुळे या दोन्ही यंत्रणांना तपास करण्याचे अधिकार नाहीत. कोरोना काळात बसवण्यात आलेले आँक्सिजन प्लांट आणि औषधे खरेदी यात अनिमितता झाल्याचा ईडी आणि EOW चा दावा केला आहे.