मालवणच्या किल्ले राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. पुतळा कशामुळे कोसळला याचं कारण अद्याप माहित नाही. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचं मोदींच्या हस्ते दिमाखात अनावरण पार पडलं होतं.
ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचं अपमान याठिकाणी झालेला आहे आणि केला गेला आहे त्याला महाराष्ट्र कसा माफ करेल? या पुतळ्यामध्ये कमिशन खाऊन कमिशन खोरी करुन निकृष्ठ बांधकाम करुन समस्त शिवसैनिकांचा अपमान करणाऱ्या या नालायक लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. मी आव्हान करतोय जर तुमच्यामध्ये दम असेल तर त्या कंत्राटदाराला लगेच एफआयआर दाखल करा आणि त्याच्याकडून सर्व काम पुन्हा करुन पैसे वसूल करा आणि तो पुतळा महाराजांचा पुन्हा उभा करा असे वडेट्टीवार म्हणाले.