व्हिडिओ

Parbhani Accident : गंगाखेड-पालम मार्गावर धावत्या एसटी बसचं चाक निखळलं

Published by : Team Lokshahi

परभणी: चक्क धावत्या बसचे चाक निखळल्याची घटना परभणीत घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

गंगाखेड आगाराची बस गंगाखेडहुन पालमकडे 62 प्रवासी घेऊन निघाली होती. गंगाखेड-पालम राष्ट्रीय महामार्गावरील केरवाडी जवळ धावत्या बसचे चाक निखळले. तरीही बस धावत होती. ही बाब त्याच रस्त्यावरून जात असलेल्या पीक-अप चालक भागवत मुंडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ बस चालकाला हातवारे करून आवाज देवून लक्षात आणून दिले, तेव्हा बसचालकाने बस थांबवली. सुदैवाने अपघात टळला.

महत्वाचे म्हणजे या बसचा वेग जास्त असल्याने टायर चक्क 100 फुटांपर्यंत जाऊन पडला. सुदैवाने पीक-अप चालक भागवत मुंडे यांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन बस चालकाच्या लक्षात आणून दिल्याने पुढील अनर्थ टळला.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ