Special Report : पुतण्यासाठी काकी धावली, दिशा सालियन प्रकरणी शर्मिला ठाकरे यांचं सर्वात मोठं विधान
दिशा सालियन प्रकरणी राज्य सरकारनं एसआयटी जाहीर केलीय. अप्पर पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात तीन अधिकाऱ्यांची एसआयटी नेमण्यात आलीय. या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काहीतरी संबंध सुरु असल्याचा भाजप नेते नाव न घेता आरोप करतायत.
Published by : shweta walge
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या पाठीशी शर्मिला ठाकरे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. आदित्य असं काही करणार नाही असं म्हणत त्यांनी आपणही अशा चौकश्यांतून गेलो असल्याचं म्हणत आदित्यची पाठराखण केलीये.