सोलापुर: नांदेड शासकीय रुग्णालयातील दुर्घटनेनंतर सोलापुरातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयाचा रियालिटी चेक केला आहे. सोलापुरच्या शासकीय रुग्णालयात शासकीय अनास्थेचा कळस पाहायला मिळत आहे. रुग्णांना औषध पुरवठा हा अपुरा पडत आहे. शासकीय अधिकारी हे रुग्णालयात मुबलक प्रमाणात औषध असल्याचा दावा करत आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात औषधं ही बाहेरील मेडिकल मधून जास्त पैसे खर्च करून आणावे लागत असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे.
तसेच रुग्णालयात 200 हून अधिक स्टाफ ची कमतरता आहे. त्याच बरोबर या ठिकाणी असलेले सिटीस्कॅन मशीन, एमआरआय मशीन कधी चालू असतात कधी बंद असतात अशी अवस्था देखील येथील शासकीय रुग्णालयाची आहे.