राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणामध्ये शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या करवी नगर भागामध्ये मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रवीण लोणकर यांनी हल्लेखोरांना रुम भाड्याने दिली होती अशी माहिती समोर आली आहे. तसेच आरोपी त्यांच्या रुमपासून काही अंतरावर राहत होता असं देखील समोर आलं आहे.
मागील 40 दिवसांपासून हे हल्लेखोर मुंबईमध्ये कुर्ल्यातील एका खोलीमध्ये राहत होते. तर ती खोली प्रवीण लोणकरने त्या आरोपींना दिली होती त्यामुळे बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात प्रवीण लोणकरचा ही काही संबंध नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रवीण लोणकरचा भाऊ शुभम लोणकर याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती ज्यात असं लिहलेलं होतं की या संपुर्ण हत्येची जबाबदारी ही बिष्णोई गॅगची आहे असा दावा केला होता.