मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय हा सर्व नेते एकत्र बसून घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत स्पर्धा नाहीच असं म्हणत विकासासाठी सत्ता स्थापन करायची आहे असं वक्तव्य डॉ. श्रीकांत शिंदेंनी केलं आहे.
तर श्रीकांत शिंदे म्हणाले की, आम्ही पहिला सर्वजण बसून निर्णय घेणार आमच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी कधी स्पर्धा नव्हतीच. कोणत्याच एका नेत्याने असं म्हटलं नाही की, मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा. आम्ही सर्वांनी मिळून अडीच वर्षात जे काम केले तेच काम आता देखील केले. त्याच्यापेक्षा चांगल काम त्याच्यापेक्षा वेगवान आणि गतीने काम आम्हाला येणाऱ्या 5 वर्षात कराचं आहे. असं शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.