श्रावण महिन्यातील आज दुसरा सोमवार आहे. श्रावणी सोमवार निमित्त महादेवाच्या मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केलेली आहे. 12 ज्योतीलिंगापैकी एक असलेला भीमाशंकर येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी गर्दी केलेली आहे. पहाटेची पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुल करण्यात आलेलं आहे. पाऊस आणि दाट धुके असताना देखील दर्शनासाठी भाविंकांची मोठी रांग येथे पाहायला मिळत आहे.
तसेच हिंगोलीच्या औंधा नागनाथ मंदिरात देखील दुसरा श्रावणी सोमवारनिमित्त भाविक पहाटेपासूनच दर्शनासाठी आलेले पाहायला मिळत आहे. तर रात्री 12 वाजता शासकीय पुजा आणि नागनाथाला दूध अर्पण करण्यात आले आहे. यानंतर 2 वाजता मंदिर भाविकांसाठी खुल झालं आहे. तर देशभरातून भाविक नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात दाखल झाले आहेत.