व्हिडिओ

Pune Crime: पुण्यातील कात्रज परिसरातील धक्कादायक घटना, 21 लाखांचे मेफेड्रोन जप्त

पुण्यातून 21 लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. कात्रज परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे.

Published by : Dhanshree Shintre

पुण्यातून 21 लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. कात्रज परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून राजस्थानमधील दोघांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आरोपीकडून 22 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कात्रज परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्री करण्यासाठी आलेल्या राजस्थानमधील दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

आरोपीच्या ताब्यातून 21 लाख 38 हजार रुपयांचे 106 ग्रॅम मेफेड्रोनसह दुचाकी असा 22 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रवणसिंग बलवंतसिंग राजपूत (वय 22, मूळ रा. नयानगर, जि. बाडमेर, राजस्थान) आणि महेश पुनाराम बिश्नोई (वय 20, मूळ रा. कुशलावा, जि. जोधपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोघे सध्या खराडी परिसरातील तुळजाभवानी नगरमध्ये राहतात.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय