शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील अनेक पदाधिकारी सध्या प्रवेश करत आहेत. 24 जणांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होत आहे. अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
सध्या पिंपरी-चिंचवडमधील 4 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेली आहेत आणि शरद पवार पक्षात ते प्रवेश करत आहेत. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी देखील राजीनामा दिलेला आहे आणि ते आता शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करत आहेत. राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या प्रवेश केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच भोसरी विधानसभा मतदारसंघातील 14 नगरसेवक आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. शरद पवारांच्या उपस्थितीत आज पुण्यातील मोदीबाग येथे पक्षप्रवेश करण्यात आला.