व्हिडिओ

Shivaji Maharaj In Ganpati Idol | पुण्यात गणपती मूर्तीत शिवरायांची प्रतिमा, संभाजी ब्रिगेड आक्रमक

Published by : Team Lokshahi

पुण्यात गणपती मूर्तीत शिवरायांची प्रतिमा पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या मूर्तीला संभाजी ब्रिगेड यांचा आक्षेप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच दैवतीकरण करणं चुकीच आहे असं देखील संभाजी ब्रिगेड म्हणाले आहेत. गणपती मूर्तीसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच विसर्जन करणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे संभाजी ब्रिगेड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती एकाच मुर्तीमध्ये दाखवन म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच विसर्जन करणार का? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार दिले आहेत या राज्याला या देशाला ते विचार पम तुम्ही विसर्जन करणार का?

देवाला देवाच्या ठिकाणी ठेवा आणि महापुरुषांना महापुरुषांच्या जागी ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गणपतीची मुर्ती महाराष्ट्राच्या कोणत्याही ठिकाणी असेल तर माझी तमाम शिवप्रेमींना विनंती आहे तशा मुर्ती विक्री करणाऱ्यांवर तातकाळ गुन्हा दाखल करा.

'जरांगेंची निवडणूक लढवण्याची पात्रता नाही' ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Gift ideas for Diwali : दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या 'हे' गिफ्ट्स

Diwali 2024: दिवाळीमध्ये उटणे लावण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

'आभाळमाया', 'वादळवाट' च्या शीर्षकगीतांचा जादूगार हरपला, गीतकार आणि पटकथाकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन

Sujay Vikhe On Balasaheb Thorat | सुजय विखेंची बाळासाहेब थोरातांवर टीका; काय आहे नक्की प्रकरण ?