कल्याणच्या टिळक चौकात शिवसेना-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. दुर्गाडीवरील घंटानाद आंदोलनापूर्वी दोन्ही कार्यकर्ते आमनेसामने आले. शिवसेना नेत्यांची भाषणं सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जोरदार घोषणाबाजी केली.
दोन्ही पक्षांकडून थोड्याच वेळात घंटानाद आंदोलन केलं जाणार आहे. दुर्गाडी किल्ला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुर्गाडी किल्ला परिसरात दरवर्षी शिवसेना करत आंदोलन असते. आता दोन्ही शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ते याठिकाणी जमा झाल्याचे पाहायला मिळतंय.