महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्षाला विचारात घेतले जात नसल्याने शेकापने स्वबळाचा नारा दिला आहे. शेकापच्या हक्काच्या जागेवर देखील महाविकास आघाडी सकारात्मक नाही. त्यामुळे शेकाप राज्यात वेगळ्या विचारत आहे.
बीडमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी बैठक घेतली. या बैठकीत बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी करण्यात आली. महाविकास आघाडीतून शेकापच्या हक्काच्या जागा न मिळाल्यास आघाडीतून बाहेर पडू असा इशारा देखील यावेळी शेकाप नेते मोहन गुंड यांनी दिला आहे.