आमदार निलेश लंकेंची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. याबाबत आजच्या पत्रकार परिषदेत मोठी घोषणा होणार आहे. निलेश लंकेंना राष्ट्रवादी शरज चंद्रपवारकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
आमदार लंके खासदारकीची निवडणूक लढवणार असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडील आमदारकीबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. यातच नीलेश लंके आमदारकीचा राजानीमा देणार, असल्याचे सांगितले जात आहे. आमदार लंकेंना कायदेशीर अडचणी येऊ नयेत म्हणून शरद पवार स्वतः कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करत आहेत.