उद्धव ठाकरेंना अटक होईल अशी वक्तव्य काही शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्याला शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी जोरदार भाषेत उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना अटक झाल्यास राज्यात वणवा पेटेल, असे वक्तव्य शरद कोळी यांनी केले आहे. सरकार जर उद्धव ठाकरेंना अटक करण्याचा विचार ही मनात आणेल तर महाराष्ट्रातला शिवसैनिक मुंबईत जमून चक्कजाम करेल, असा इशारा देखील शरद कोळी यांनी यावेळी दिला आहे.