सासवडमधील ईव्हीएम चोरी प्रकरणात मॅटचा राज्य सरकारला दणका पाहायला मिळतोय. निलंबित तिन्ही अधिकाऱ्यांना मूळ जागी नियुक्ती देण्याचे आदेश निलंबनाविरोधात असल्याचं म्हटलं आहे. निलंबनाविरोधात अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती.
सासवड तहसीलदार कार्यालयातून 5 फेब्रुवारीला ईव्हीएम चोरी झाल्याची घटना उघडकीस झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने तीन अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं. या प्रकरणी राज्य सरकारने पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत अणि उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) तानाजी बरडे यांना निलंबित केले होते.