व्हिडिओ

Sanjay Raut : 'बीडमधील कालचं आंदोलन शिवसेना UBTचं नव्हतं'

बीडमधील कालचं आंदोलन शिवसेना UBTचं नव्हतं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या वाहनावरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही.

Published by : Team Lokshahi

बीडमधील कालचं आंदोलन शिवसेना UBTचं नव्हतं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या वाहनावरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही. आंदोलन मराठा कार्यकर्तांच होत असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सुपारी फेकणाऱ्यांमध्ये मनसैनिक असतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आरक्षणावर सर्वच राजकीय पक्षांनी संयम बाळगणे गरजेच आहे. मनसेने आम्हाला इशारा देऊ नये भाजपला द्यावा असं ही संजय राऊत म्हणाले आहेत.

यावर संजय राऊत म्हणाले, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात. पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी. आमच्या माहित प्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्तांच होत आरक्षणा संदर्भात. कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील. पण ते सगळ्यांच एक आंदोलन होत.

संजय राऊतांच्या, 'तुम्हाला धमक्या द्यायच्या असतील तर त्या आम्हाला देऊ नका' या वक्तव्यावर राज ठाकरे म्हणाले, ती शरद पवारांची सोंगटी आहे, त्याच्या अमंगल कार्यातील करवली आहे ती. तो उंबरठ्यावर बसूनचं आयुष्य झिजवणार.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी