वंचितने महाविकास आघाडीचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. लोलसभेसाठी दोन जागेचा प्रस्ताव फेटाळला आहे. तर वंचितच्या राज्य कार्यकारिणीने हा प्रस्ताव फेटाळल्याची माहिती आहे.
वंचित बहूजन आघाडीने ४ जागांचा एक प्रस्ताव दिला आहे. त्यांना त्यावर विचार करायचं आहे. त्यांना विचार करुन यायचे आहे की हे जे ४ सीटचे आम्ही प्रस्ताव दिला आहे जे त्यांनी आमच्याकडे मागितली होती, जोपर्यंत या प्रस्तावावर त्यांच्या पार्टीची चर्चा होत नाही तोपर्यंत आम्ही काय चर्चा करणार. पण प्रकाश आंबेडकर आहेत म्हणून आम्ही वेगळे विचार करु असे संजय राऊत म्हणाले आहेत.
सिद्धार्थ मोकळे यांची प्रतिक्रिया म्हणाले की, महाविकास आघाडीतले काही नेते माध्यमांना खोटी माहिती देऊन आमच्याबद्दल जर भ्रम पसरवत असतील तर आम्हाला आमची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. संजय राऊत हे माध्यमाला खोटी माहिती देत आले की सगळं अलबेल आहे, आमचं सगळं व्यवस्थित आहे. ४० जागा झाल्या, ३९ जागा झाल्या हे सगळं सांगितलं जात होतं. जर ४० जागांचं वाटप झालेलं होतं त्यात कोणता वाद नव्हता तर ह्या १५ जागांचा तिढा कसा काय आहे? हा १५ जागांचा तिढा म्हणजे त्यांनी खोटी माहिती दिली होती. महाविकास आघाडीच्या वतीने ज्या दोन जागेचा प्रस्ताव त्यांनी मला दिला होता. तो वंचित आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने एकमताने फेटाळलेला आहे. आम्हाला हरणाऱ्या त्या दोन जागा ज्या त्यांनी देऊ केलेल्या होत्या त्या दोन जागा आम्हाला मको आहेत. अकोल्याचीही जागा आम्ही सोडण्याची तयारी दाखवली होती आणि अकोला व्यतिरिक्त ज्या या दोन जागेचा प्रस्ताव महाविकास आघाडीचे पक्ष आम्हाला देत होते तो आम्ही नाकारलेला आहे.