व्हिडिओ

Sanjay Raut | चंद्रपूरमधील शाळा अदानींच्या ताब्यात, राऊतांची सरकारवर टीका, काय म्हणाले? पाहा

अदानी समुहाचा चंद्रपूरमधील शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश झालेला आहे. चंद्रपूरमधील शाळा अदानींच्या ताब्यात गेल्याची बातमी समोर येत आहे.

Published by : Team Lokshahi

अदानी समुहाचा चंद्रपूरमधील शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश झालेला आहे. चंद्रपूरमधील शाळा अदानींच्या ताब्यात गेल्याची बातमी समोर येत आहे. माउंट कार्मेल कॉन्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी समुहाकडे दिल्याची माहिती मिळाली आहे. शालेय शिक्षण विभागाडून शाळा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर पुढील 15 दिवसांत शाळेचे व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश ही देण्यात आले आहेत.

यापार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणले की, या देशाचे व्यवस्थापनच अदानीकडे आहे. एक शाळा चंद्रपुरातली म्हणजे आता हळू हळू हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा अदानींचा महाराष्ट्र करण्याचा घाट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घातलेला आहे. एक शाळा चंद्रपुरातली हा प्रश्न एवढ्यापुर्ता मर्यादीत नाही संपुर्ण मुंबई अदानीच्या घशात घालण्याचं धारावी प्रकल्पाच्या निमित्ताने सुरु आहे. आज शाळा गेल्या, उद्या कॉलेजे जातील अनेक ऐतिहासिक वास्तू अदानीकडे दिल्या जातील.

नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; भेसळयुक्त 688 किलो मिठाई जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची एकाच दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची एकाच दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा

वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंची सरवणकरांसोबत 2 तास चर्चा; सरवणकरांना 4 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम

Diwali 2024: लक्ष्मी पूजनाला झेंडूची फुलं का वापरतात?