मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. 50 हजार रुपयांचा जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. याचपार्श्वभूमीवर संजय राऊत प्रतिक्रिया देत म्हणाले की, आम्हाला निवडणुकीच्या कामातून कुठे तरी गुंतवून ठेवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया चालूच असते.
न्यायालयीन लढाया आमच्यासाठी काय नवीन नाही कायदा आम्हाला कळतो. जनतेच्या हितासाठी आम्ही काही विधान केली असतील, त्याच्यावर जर का कोणी मानहानीचा दावा टाकत असेल तर ते हेतू बरोबर नसतात त्यांचे खालच्या कोर्टाने आम्हाला शिक्षा ठोठावली आम्ही वर्च्या कोर्टात गेलो.
आम्हाला खात्री आहे हा खटला जेव्हा नव्याने चालवला जाईल. तेव्हा आम्ही जे भ्रष्टाचारा विरोधात मुद्दे मांडलेले आहेत पुरावे दिलेले आहेत. त्याचा नक्की पुनविचार केला जाईल. भ्रष्टाचाराचे जे पुरावे दिले ते खालच्या कोर्टाने का ग्राह्य धरले नाहीत हा प्रश्न आम्ही केला आहे.