विधानसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता राज्यात महायुतीचंच सरकार आलं हे जवळपास निश्चितच झालं. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 25 तारखेला होणार असल्याचं महायुतीकडून जाहीर करुन टाकण्यात आलं आहे. याबाबत आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. जे काही घडलं त्याला धनंजय चंद्रचूड जबाबदार आहेत असा आरोप केला आहे.