केंद्रीय अर्थमंत्र्यांनी एकाधिकार आणि मक्तेदारीसंदर्भात धोक्याचा इशारा आणि नगारा वाजविला असला तरी हा नगारा कोणी फोडायचा? हे आव्हान कोणी पेलायचे? देशाचे सत्ताधारी म्हणून हे सगळे तुम्हालाच करायचे आहे. महागाईवर केंद्रीय अर्थमंत्र्यांची 'चिंता' आणि त्याबाबतच्या आव्हानांवर केलेले 'चिंतन' नक्कीच 'चिंतनीय आहे. मात्र आता फक्त उक्ती नको, कृतीही हवी! कृती कधी करणार? या प्रश्नाचे उत्तर जनतेला हवे आहे. कारण भडकलेल्या महागाईच्या वणव्यात ती एका हतबलतेने होरपळून निघत आहे. या वणव्यातून तिला सुखरूप बाहेर काढणे ही तुमच्याच सरकारची जबाबदारी आहे! असं सामनातून म्हटले आहे.