पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्या प्रकरणी साक्षीदार असणाऱ्या स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना एक पत्र लिहलं आहे. पत्राचाळ प्रकरणी पोलीसांना दिलेला जबाब बदलण्यासाठी संजय राऊत दबाव टाकत असल्याचं स्वप्ना पाटकर यांनी सांगिलतेलं आहे. माझ्या जीवाला धोका असं सांगत स्वप्ना पाटकर यांनी आरोप केला आहे.