महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मतदान केल्यानंतर संदिप नाईक म्हणाले की, बेलापूर मतदारसंघामधील 10 वर्षाचा बॅकलॉग आणि समतोल असा विकास हा गावगावठाण असेल शहर असेल झोपडपट्टी परिसर असेल, जेष्ठ नागरिक असतील, युवावर्ग असेल, महिलांचे संरक्षण असेल या सर्व गोष्टी संतुलित होण्याकरता बेलापूर मतदारसंघाच्या विकासाकरता योग्य व्यक्तीस बेलापूर मतदारसंघातील मतदार मतदान करतील. असा माझा ठाम विश्वास आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, नवी मुंबई बेलापूर मतदारसंघातील जनता ही सुज्ञ आहे. त्यामुळे या कालखंडामध्ये योग्य व्यक्तीला बेलापूर मतदारसंघातील मतदारांचे मतदान होईल. माझ्याविरोधात ज्या पद्धतीने सर्वजण मैदानात उतरले आहेत. त्यापेक्षा महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, बेलापूर मतदारसंघातील मतदार माझ्यासोबत आहेत. असे संदिप नाईक म्हणाले.