1 जानेवारी, 1 मे अन् आता 15 ऑगस्ट... हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा एकदा टळला आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 जुलै रोजीच केली होती... मात्र, पंतप्रधानांच्या व्यग्रतेमुळे समृद्धीचे उद्घाटन पुन्हा एकदा लांबणीवर पडले..पाहू या लोकशाहीचा विशेष रिपोर्ट...
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2015 रोजी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा केली. ज्यांच्या मंत्रालयाअंर्तगत समुद्धीचे काम सुरू झाले ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर समृद्धीचे उद्घाटन हा प्राधान्याचा विषय बनला. समृद्धीच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यात आणण्याची शिंदे-फडणवीस यांची आकांक्षा आहे. परंतु स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यामुळे पंतप्रधानांची वेळ मिळाला नाही.
एकूण 16 टप्प्यांत समुद्धी महामार्गाचं बांधकाम सुरू आहे. एकंदरीत नागपूर- मुंबई 701 किलोमीटरच्या महामार्गात 1699 ठिकाणी छोटी मोठी बांधकामं आहेत. यातील जवळपास 1400 च्यावर बांधकामं पूर्ण झाली आहे. उरलेली बांधकामं अजून तरी जवळपास एक वर्षांचा कालावधी लागणार आहे.
महामार्गाचे 85 टक्के काम पुर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डीचा 701 किमीपैकी 520 किमीचा पहिला टप्पा 15 ऑगस्ट 2022 रोजी सुरु होणार होता. त्यानंतर डिसेंबरपर्यंत नागपूर ते इगतपुरी 623 किमीचा दुसरा टप्पा सुरु करण्याचे नियोजन आहे. 2023 पर्यंत संपुर्ण महामार्ग सुरु झाल्यावर मुंबई-नागपूर आंतर केवळ 8 तासांत पुर्ण होणार आहे.