छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी देण्यावरून मराठा समाज आक्रमक झालाय. छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी द्या अशी मागणी मराठा समन्वयकांनी केलाय. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विश्वासघात करू नये,तसंच संभाजीराजेंना विरोध करणाऱ्यांना पाणी पाजू असा सज्जड इशाराही मराठा समन्वयकांनी दिलाय.