ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. छत्रपती संभाजी नगरमधील विभागीय कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. पंतसंस्थेतील महत्त्वाची कागदपत्र ईडीने ताब्यात घेतली आहेत. ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झालेला होता आणि त्यानंतर आता ईडीने छापेमारी केली आहे. या कंपनीचे मालक आणि या बॅंकेचे सर्वेसर्वा यांनी पैशांचा फेरफार करून स्वतःच्या कंपन्या मोठ्या केल्या.
खातेदाऱ्यांच्या पैश्यांचा त्यांनी असा वापर केल्यामुळे आता खातेदारांना पैसे मिळत नाही आहेत. जास्तीच व्याजाचं आमिश दाखवून त्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले मात्र यानंतर फसवणूकीचे 50 पेक्षा ही जास्त गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत. त्यामुळे यासर्व गोष्टींची तपासणी करण्यासाठी ईडीने या कंपनीवर छापा टाकला आहे.