सांगली: नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये आजपासून बंदची हाक देण्यात आली आहे. 19 ऑगस्टला सायंकाळी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने कांद्याचे निर्यात शुल्क 40 टक्के केल्याचा अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाला नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. यावरच आता रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कांद्याचे दर वाढले की केंद्र सरकारच्या पोटात दुखायला लागतंय,पण लोकसभेच्या निवडणुकीत हाच कांदा जुलमी ठरेल,असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात शुल्क रद्द करावी,अशी मागणी देखील सदाभाऊ खोत यांनी केली आहे. त्याच बरोबर कांद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर ही निशाणा सत्तांना सभागृहामध्ये एक आणि बाहेर एक अशी भूमिका घेतली जाते, अशी टीका राष्ट्रवादीवर केली आहे.