ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि देशाच्या राजकारणासाठी महत्त्वपूर्ण आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात वातावरण आहे. याचा आम्हाला फायदा आहे. इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मिळून ही निवडणूक लढवत आहोत. स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जे सत्तेत बसले आहेत.त्यांना यावेळेस सत्तेच्या बाहेर जावं लागेल.महाराष्ट्रातील हा संदेश संपूर्ण देशात जाईल असे विधान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी आज नांदेडमध्ये केले.
जिथं जिथं आम्ही महाविकास आघाडी मिळून लढत आहोत तिथं आम्ही नक्की विजयी होऊ. दरम्यान काँग्रेस एक व्यक्ती नाही,एक विचारधारा आहे. काँग्रेस पक्षात अनेक लोक आलेत आणि अनेक जण गेले आहेत.परंतु काँग्रेस पक्ष हा आपल्या मेहनतीवर आणि आपल्या विचारधारेवर निवडणूक लढवत आहे.भोकर मधील काँग्रेस पक्षाचा उमेदवार मॅनेज आहे किंवा नाही हे येणाऱ्या निवडणुकीत कळेल असे सचिन पायलट म्हणाले.