कन्नड सहकारी कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईनंतर रोहित पवारांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. राजकीय सूडापोटी कारवाई केल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. तसेच जप्तीच्या आदेशाची अधिकृत माहिती बारामती अॅग्रोला कळवलं नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
ईडीने बारामती अॅग्रोविरोधात सुरू केलेला तपास बेकायदेशीर असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. आपली बाजू सत्याची आहे काळजी करू नका असे आवाहनही रोहित पवारांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना केलं आहे. दरम्यान संजय राऊतांनी भाजपला जोरदार चिमटे काढलेत, तर फडणवीसांनी कारवाईशी आपला काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.