व्हिडिओ

आमदार भरणेंनी शिवीगाळ केलेला व्हिडिओ रोहित पवारांनी केला ट्विट

Published by : Dhanshree Shintre

देशामध्ये लोकसभा निवडणूक मतदान 7 टप्प्यामध्ये होत असून यातील 2 टप्पे पार पडले आहेत. आज म्हणजे 7 मे रोजी याचा तिसरा टप्पा आहे. आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असताना त्याचबरोबर रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, दत्ता भरणेंची दादागिरी करण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विटरला शेअर केला आहे. दत्ता मामा कशी जिवंत राहणार लोकशाही अशा पद्धतीचा प्रश्न विचारत रोहित पवार यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे.

रोहित पवार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले की, केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते.

पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा