निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये शरद पवार स्वतःच्या मर्जीने पक्ष चालवतात असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता. त्यावर प्रत्युत्तर देत रोहित पवारांनी अजित पवार गटावर निशाणा साधलाय. पवार साहेबांनी अनेकांना मंत्री पद दिली,अधिकारही दिले त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप केला नाही पण,आज ते विरोधी गटात स्वार्थासाठी गेले आहेत आणि जाऊन म्हणतात शरद पवार मर्जीने पक्ष चालवतात असं वक्तव्य करणे अशोभनीय असल्याचं रोहित पवार म्हणाले.