पुणे शहरात झिका व्हायरसचा धोका वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात झिका विषाणूचे एकूण 66 रुग्ण आढळले असल्याची माहिती मिळत आहे. 26 गर्भवती महिलांना देखील झिका विषाणूची लागण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार असून पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात खबरदारी घेतली जात आहे.