ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम कुत्ता व्हायरल व्हिडिओ प्रकरणी हा गुन्हा दाखल केला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुधाकर बडगुजर म्हणाले की, 8 वर्षानंतर बेकायदेशीर कृत्य केल्या प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. तिथे असणाऱ्या इतर पक्षाच्या लोकांवर देखील गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. मी फक्त तिथे 5 मिनिट होतो त्यामुळे तिथे असणाऱ्या बाकी लोकांवर देखील कारवाई झाली पाहिजे. खासदारांचे देखील एक व्हिडिओ वायरल झाले होते. त्यावर काही कारवाई करण्यात आली नाही. विरोधकांना दाबण्याचा हा प्रयत्न निंदनीय आहे. आम्ही केले ते पाप त्यांनी केले ते पुण्य असे सरकार वागत आहे, असं सुधाकर बडगुजर म्हणाले.
उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब हे भक्कमपणे माझ्या पाठीशी आहेत. आताच आम्हाला फोन आला होता, ते म्हणाले घाबरायचं काहीच कारण नाही, चिंता करायचं काहीच कारण नाही, आपण लढू. साहेबांना माहिती आहे हाऊसमध्ये काय झालं होत. ते तेव्हा तिथेच होते. उद्धव ठाकरे साहेब आणि संजय राऊत साहेब यांना नाशिक बद्दल प्रेम आहे. जे सर्व झालं आहे ते सर्व मोडून काढून शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे, असं सुधाकर बडगुजर म्हणाले.