दापोलीच्या सभेत आदित्य ठाकरेंनी उमेदवार योगेश कदम आणि रामदास कदमांचा गद्दार असा उल्लेख केला. गद्दारांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी अशी जोरदार टीका आदित्य ठाकरेंनी केलीय याला रामदास कदमांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा माझं पर्यावरण खातं घेतलं, खरा गद्दार तुच आहेस. असं म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिलंय.