संविधान दिवस जो आहे तो आपल्या देशासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस आहे असं म्हणत रामदास आठवलेंनी एकनाथ शिंदेंजवळ मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीच्या मोठ्यासंख्येच्या मदाधिक्यांनी विजय झाला. त्यात भाजपने जास्त जागा जिंकल्याचं पाहायला मिळाल.
तर आता महायुतीमधून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार यावर चर्चा होताना दिसून येत आहेत. यामध्ये जागांचा विचार केला तर भाजपच्या जागा जास्त आहेत त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी योग्य आहेत असा दावा करण्यात आला आहे. तर एकनाथ शिंदे ही मुख्यमंत्री व्हावेत असं मागण जनतेकडून असल्याचं पाहायला मिळालं.
मात्र आता यापार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी आपलं वक्तव्य मांडल आहे. त्यात रामदास आठवले म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा चांगला विजय झाला आहे. मुख्यमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस यांना मिळाव. पण मुख्यमंत्री पदावरून शिंदे नाराज आहेत. पण त्यांनी त्यांची नाराजी लवकरचं दुर करावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केलेली आहे.