राजेश टोपे आणि अजित पवारांच्या भेटीच्या चर्चा चालू असताना राजेश टोपेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या भेटीच्या बातमीवर स्पष्टीकरण दिलं आहे.
रात्री मी उशीरा माझ्या मतदारसंघातून निघालो आणि पहाटे 4 वाजता पुण्यात आलो तेव्हा मुक्कामासाठी गेस्टहाऊसला दोन तासांसाठी थांबलो. सकाळी उठलो आणि रायगडाकडे जायला निघालो असताना अजितदादांची दर वेळी प्रमाणे गेस्टहाऊसमध्ये मिटींग सुरू होती. अजितदादांची आणि माझी भेट झालीच नाही, मी सरळ जाऊन गाडीत बसलो. पण गेस्टहाऊसमधून बाहेर येताना पाहून कोणीतरी चुकीचा अंदाज घेतलेला दिसत आहे, असं रोजेश टोपे म्हणाले.