राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शिंगणे लवकरच हाती तुतारी घेणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. अजित पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. सिंधखेड राज्यामधील बैठकीत राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करत तुतारी चिन्हाला निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं राजेंद्र शिंगणे म्हणाले आहेत.
याचपार्श्वभूमीवर राजेंद्र शिंगणे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत असताना जवळपास 99 टक्के कार्यकर्त्यांनी सहकार्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आदरनीय पवार साहेब यांच्या बरोबरचं त्याठिकाणी तुतारी चिन्हावर मी निवडणूक लढवावी अशा प्रकारची मागणी याठिकाणी केलेली आहे. मी त्यांना अवढचं सांगितलेलं होतं, मला जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन आपण दोन दिवसात कार्यकर्तांच्या मनातला निर्णय आपण घेऊ.