राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांविरोधात उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपुर दक्षिण-पश्चिमेमध्ये मनसे उमेदवार देण्याचे संकेत आहेत. तर मनसे नेते तुषार गिरे यांना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
नवरात्रोत्सवात राज ठाकरे नागपुरची उमेदवारी जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली असून राजू उंबरकर यांनी ही माहिती दिली आहे. राज ठाकरे ज्यांनी लोकसभा निवडणूकीला देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला होता तसेच त्यांच्या नेत्यांचा प्रचार देखील केला होता. मात्र आता विधानसभेच्या निवडणूकीमध्ये राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवारी देणार आणि आपला उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये याची घोषणा देखील केली जाणार आहे. तर आता नागपुरमधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनसेमधून कोण निवडणुक रिंगणात उतरणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.