खबरदारीने मृत्यू टळला पण काही लोक घाईगडबडीत अपघाताचे बळी ठरतात. अशी बहुतांश प्रकरणे रेल्वे स्टेशनवर किंवा रेल्वे फाटकांवर दिसतात. जेव्हा लोक संयम ठेवू शकत नाहीत तेव्हा ते अपघातात आपला जीव गमावतात. तुमच्या लक्षात आले असेल की अनेकदा रेल्वे स्टेशनवर एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ओव्हर ब्रीजऐवजी रुळांवर उतरून दुसऱ्या बाजूला जाणे अधिक योग्य ठरते. (railway staff saved man life on railway platform shocking video viral on social media)
पण ते जीवघेणेही ठरू शकते. सध्या पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्थानकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एका सहकाऱ्याचा जीव वाचला. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक या रेल्वे कर्मचाऱ्याचे जोरदार कौतुक करत आहेत.
पश्चिम मिदनापूरच्या खरगपूर रेल्वे विभागातील बालीचक स्टेशनवर गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली. जिथे रेल्वे कर्मचारी सतीश कुमार यांच्या सतर्कतेमुळे आणि अदम्य धैर्यामुळे एक व्यक्ती रेल्वे अपघातातून वाचली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, बालीचक स्टेशनवर फारशी वर्दळ नाही. दरम्यान, रेल्वे कर्मचारी सतीश कुमार मालगाडीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी फलाटावर येतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यादरम्यान अचानक त्यांची नजर रेल्वे ट्रॅकवर पडते आणि ते सरळ पळू लागतात.