घड्याळ पवार साहेबांचं आहे की कुणाचं? हा निर्णय राज ठाकरे नाही तर मी दिलेला आहे; अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसने कुलाब्यात दिलेला उमेदवारास कोणी ओळखतं का?, ते कुठे राहतात? असे पोस्टर्स आता कुलाब्यात लावायची वेळ आलेली आहे, असा खोचक टोलाही त्यांनी महा विकास आघाडीचे उमेदवार हिरा देवासी यांना लगावला आहे.