आमदार अपात्र प्रकरणात विधान सभा अध्यक्षांना सुनावणीसाठी येत्या 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. यावरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार आहे. हे देशासाठी उदाहरण असेल' असं ते म्हणाले.
दरम्यान, आमदार अपात्रताप्रकरणी मुदत वाढवून द्या अशा आशयाची याचिका विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल होती. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३० डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याचे निर्देश न्यायालयाने गेल्या सुनावणी वेळी दिले होते.