राहुल गांधींच्या आरोपांना आता भाजपकडून प्रत्युत्तर मिळालं आहे. कॉंग्रेसचे देखील अदानीसोबत करार आहेत असं संबित पात्रा यांनी म्हटल आहे. तेलंगणामध्ये अदानी कंपनीचा कॉंग्रेससोबत 12400 कोटींचा करार आहे. राहूल गांधी आधी आरोप करतात मग माफी मागतात असा आरोप देखील संबित पात्रा यांनी म्हटलेलं आहे.
याचपार्श्वभूमीवर संबित पात्रा म्हणाले की, एक घोटाळेबाज आणि करप माणसाकडून तुम्ही डोनेशन का घेतल. तुमच्या सरकारने 100 करोडाचे डोनेशन का घेतले. 23 जानेवारी 2024 रेवेंत रेड्डी जे की तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत.
12400 कोटींचा करार तुम्ही घेतला याच उत्तर कोण देणार राहूल गांधीजी? राफेलला घेऊन पण राहूल गांधी असेच प्रकट झाले होते. खुप मोठा खुलासा होणार आहे... पुर्ण जगात खळबळ माचली आहे... चौकीदार चोर आहे... कोविडच्या काळातसुद्धा राहूल गांधी वॅक्सिनला घेऊन पत्रकार परिषद राहूल गांधी घ्यायचे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात जाऊन माफीनामा दिला आहे.