महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचारासाठी आले आहेत. त्यांची सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है तो सेफ हैं…’ या घोषणेचा नवीन अर्थ सांगितला. तसच महायुतीवर हल्लाबोल देखील केला आहे.
या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी अगदी बरोबर घोषणा दिली आहे. एक कोण आहे…तर अदानी आहे. सेफ कोण आहे तर अदानी आहे. ही घोषणा गौतम अदानी यांच्यासाठी आहे. संपूर्ण काम एका व्यक्तीच्या मदतीसाठी आहे अस ते म्हणाले.