आग्र्याच्या लाल किल्ल्यावर सुरू असलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे मीडिया जात असताना मीडियाला रोखले आणि पोलिसांनी धक्काबुक्की केली. माध्यम कर्मीयांना जोरदार धक्काबुक्की केली तर बराच वेळ गेट वर राडा सुरू होता. माध्यम प्रतिनिधी आत घुसण्याचा प्रयत्न करत असतानाच किल्ल्याचे दोन्ही दरवाजे बंद केले.