पुणे शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका आहे. खडकवासला मुळशीतील विसर्ग वाढवलेला आहे, त्यामुळे पूरसदृश स्थिती पाहायला मिळत आहे. भिडे पूल पाण्याखाली गेलेलं आहे तर एकतानगर परिसरात पाणी साचलेलं आहे तर प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच खबरदारी म्हणून प्रशासनाकडून जागोजागी सुरक्षाजवान तैनात करण्यात आलेले आहेत. पुण्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची संतत धार सुरु आहे त्यामुळे धोका वाटण्याचं म्हटलं जातं आहे.