तुळजाभवानी मंदिरामधील VIP पास घोटाळा प्रकरणाच्या संदर्भात अखिल भारतीय निर्मुलन संघर्ष समिती आता आक्रमक झाली आहे. चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मंदिर संस्थांच्या परिसरापासून बोंबामारो आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी तहसीलदार सोमनाथ वाडकर यांना घेराव देखील घातला आहे.